१८व्या-१९व्या शतकात युरोपात तयार झालेली आणि साम्राज्यवादामुळे जगभर पसरलेली मूल्ये शिवाजीमहाराजांवर लादणे हा इतिहासाचा विपर्यास होय.
अभ्यासक शिवाजीमहाराजांना ‘सेक्युलर’ सोसायटीचा सभासद करून टाकतात किंवा एकदम हिंदुमहासभेचा पुढारी बनवतात, हे अयोग्य असे आपल्या पूर्वसुरींनी बजावले आहे. उदारमतवाद, सेक्युलर स्टेट आणि लोकशाही व्यवस्था युरोपात जन्माला आली आणि ती जगभर पसरली. राजधर्मात काही मूल्ये समान असली तरी महाराजांच्या पाठचा वारसा इथून आलेला नव्हता, तर त्यापाठी भारतीय (मुख्यतः हिंदू) राजकीय व्यवस्थेचा व मूल्यांचा भाग जास्त होता.......